सा.क्रांतिवीर..नांदगाव शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.पाटील

नांदगाव-: संतोष कांदे
    भारतीय राष्ट्रीय महिला कॉंग्रेसच्या नांदगाव शहर अध्यक्षपदी माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष डॉ.ममता पाटील यांनी सौ.रुपाली चेतन पाटील यांची निवड केली आहे.
     सौ.पाटील यांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार राहिलेला असून,त्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक मनसुखअप्पा पाटील यांच्या स्नुषा,तर माजी नगराध्यक्ष चेतन पाटील यांच्या पत्नी आहेत.
       यावेळी सौ.पाटील यांनी पक्षाच्या माध्यमातून महिलांना सबल व सक्षम करण्यास प्राधान्य देऊ असे सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार अड.अनिल आहेर,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सुनीता अनिल आहेर,प्रदेश सचिव मुनवर सुलताना,तालुकाध्यक्ष समाधान पाटील,विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर,कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर पवार,युवक तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे,डॉ. प्रवीण निकम,उदय पाटील,अनिल जाधव,उदय पवार  आदींनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ