सा.क्रांतिवीर...नांदगाव तालुका भाजप बूथ प्रशिक्षण शिबीर उत्साहात.!

नांदगाव-: संतोष कांदे
   भाजपच्या नांदगाव तालुका मंडल व मनमाड शहर मंडल आयोजित बूथ प्रशिक्षण शिबीर नुकतेच शहरातील माऊली मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले.
        सकाळी नऊ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात द्वीप प्रज्वलन,प्रतिमा पूजन,आणि उदघाटन सोहळा पार पडला.यानंतर प्रथम सत्रात केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात आली.दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परीवार चा परीचय करून देण्यात आला.तिसऱ्या सत्रात जनसंघ ते भाजप इतिहास व विकास यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.तर चौथ्या सत्रात लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी व व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली.तर पाचव्या सत्रात या शिबिराचा समारोप करण्यात आला.
        या शिबिरासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण,प्रदेश सदस्या अड.जयश्री दौंड,माजी आमदार संजय पवार,जिल्हा सरचिटणीस भावराव निकम,राजेंद्र पवार,भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,यांच्यासह                                               भाजपा नांदगांव तालुका मंडल, आणि मनमाड शहर मंडल  मधील सर्व सन्माननीय बूथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, प्रदेश, जिल्हा आणि मंडल तील सर्व पदाधिकारी, सर्व आघाड़या चे पदाधिकारी, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधि, जि.प. ,प.स., कृउबा सदस्य ,आणि सर्व सक्रिय सदस्य यावेळी उपस्थित होते. 
  

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ