सा.क्रांतिवीर..जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम मध्ये आनंद मेळावा संपन्न.!

विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानासह धार्मिक,सामाजिक कामाची आवड निर्माण करणारी शिक्षण संस्था.!

नांदगाव-: संतोष कांदे

इंग्लिश माध्यमाची शाळा असतानाही पुस्तकी ज्ञानासह सामाजिक असो वा धार्मिक अशा सर्वच कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणाऱ्या जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये नवरात्रोत्सव निमित्ताने आनंद मेळावा भरवण्यात आला.
       शिक्षण घेत असताना विद्यार्थी एकत्र असतातच,मात्र त्यांच्यात एकतेची, समानतेची भावना ते जेव्हा एकत्र येवून एखादा खेळ खेळतात,किंवा एखाद्या गोष्टीचा एकत्र येऊन आनंद लुटतात. तेव्हा निर्माण होते,या व्यापक अर्थाने विचार करत जे.टी. कासलीवाल विद्यालय प्रशासनाने व संचालक मंडळाने नवरात्र उत्सव निमित्ताने एक आनंद मेळावा भरवला,त्यात सर्व प्रकारचे बाल खाद्य पदार्थ ठेवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
    पृथ्वीराज महाले,वेदिका वाघ,कृतिका धूत,आरुष जाधव,प्रियल फोफलिया,अचल बोरसे या विद्यार्थ्यांच्या ही पालकांनी सहभाग नोंदवत या कार्यक्रमाची रंगत वाढवली.यावेळी वेशभूषा,दांडिया,गरबा या मनोरंजक स्पर्धेचे परीक्षण श्रीमती तस्लिम, श्री.गायकवाड यांनी केले तर मार्गदर्शन वैशाली सोनवणे,सविता शिंदे,ज्योती बागले, वैशाली पाटील,यांनी केले.
     कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील कासलीवाल,रमनकाका कासलीवाल,विजय चोपडा,प्रमिला कासलीवाल,रिकबकाका कासलीवाल,जुगलकाका कासलीवाल,श्री.चांदीवाल,प्रशासक श्री.गुप्ता,प्राचार्या रेणू पिल्ले उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ