सा.क्रांतिवीर...जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचा उद्या नांदगाव तालुका दुष्काळी दौरा.!

नांदगाव-: संतोष कांदे

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन उद्या नांदगाव तालुका दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत.तहसील कार्यालयात होणाऱ्या बैठकीत ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
      या बाबत मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिक -देवळा -बागलान -मालेगाव -नांदगाव
तालुक्यात ते दौरा करून तेथील सत्य परिस्थिती जाणून घेणार आहेत.नाशिक हुन  साडेआठ वाजता निघून ते प्रथम देवळा तालुक्यातील दुष्काळी गावांची साडे नऊ ते साडे दहा या वेळेत पाहणी करतील.त्यानंतर बागलाण तालुक्यातील गावांची पाहणी दौरा ११ ते १२ या कालावधीत होईल,
वरील दोन्हीही तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक बागलाण तहसील कार्यालय येथे होईल.
त्यानंतर ते मालेगाव तालुक्यातील गावांचा पाहणी दौरा करतील.हा दौरा दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान असेल.
     दुपारी तीन वाजता तालुक्यात येऊन एक तास दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर चार वाजेच्या आस पास मालेगाव आणि नांदगाव या दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक येथे घेणार आहेत.
*आणि नंतर माननीय मंत्री महोदय चांदवड तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा करतील.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ