सा.क्रांतिवीर...मनमाड मध्य रेल्वे युनिट कडून नागरीक सुरक्षा प्रात्यक्षिक.!

नांदगाव-: संतोष कांदे

मध्य रेल्वे नागरीक सुरक्षा संघटनेतर्फे मनमाड च्या येवला रस्त्यालगत असलेल्या करुणा रुग्णालय येथे नागरीक सुरक्षा संघटन मनमाड युनिट द्वारा भव्य आपदा प्रबंधनाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
     ज्यात विविध प्रकारच्या आगी व त्यांना विझवण्याचे विविध प्रकार तसेच विमोचनाच्या  पद्धतींचे प्रकार आयोजित करण्यात आले होते तसेच नागरी वस्ती मध्ये होणाऱ्या बॉम्बस्फोट, भूकंप , अपघात या आपत्तींच्या वेळी होणारे नुकसान कसे टाळावे व त्याच वेळी होणाऱ्या दुर्घटनांचा सामना कसा करावा याबद्दल प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्यात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी केले जाणारे उपाय व जखमींना कशाप्रकारे विमोचन करून त्यावर प्रथम उपचार केला जातो यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच उंच इमारतींवर अडकलेल्या जखमी लोकांना विविध प्रकारच्या  बचाव पद्धतींद्वारे विमोचन करून त्यांना  उपचारासाठी ॲम्बुलन्स द्वारे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
       या कार्यक्रमासाठी मध्य रेल्वेचे डॉक्टर श्री.क्षत्रिय आणि कारखान्याचे सहाय्यक कारखाना प्रबंधक व नागरिक सुरक्षा संघटन अधिकारी पी ए पाप्पाचन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन उपमहाप्रबंधक तसेच नागरिक सुरक्षा नियंत्रक ,मध्य रेल्वे, मुंबई यांच्या दिशानिर्देशानुसार आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास वैद्य नागरिक वरीष्ठ सुरक्षा निरीक्षक ,मध्य रेल्वे, मुंबई यांनी केले.
         कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चंद्रशेखर दखणे नागरिक सुरक्षा निरिक्षक,मनमाड युनिट यांचे मार्गदर्शन लाभले. यात सेंट्रल इंजिनियरिंग वर्कशॉप मधील नागरिक सुरक्षा संघटनेचे इंस्ट्रक्टर तसेच स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ