सा.क्रांतिवीर....नांदगाव नगरपरिषद च्या उपनगराध्यक्षपदी चांदणी खरोटे.!
नांदगाव-: संतोष कांदे
नांदगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या चांदणी खरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असून,ठरलेल्या आवर्तनानुसार सौ.कामिनी सचिन साळवे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे,व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या सर्वसहमतीने खरोटे यांची निवड करण्यात आली.यावेळी नगरसेवक नितीन जाधव व कारभारी शिंदे सूचक,अनुमोदक होते तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी काम पाहिले,त्यांना मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ,संतोष डुंबरे यांनी सहाय्य केले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुहास कांदे,तालुकाप्रमुख किरण देवरे,नगराध्यक्ष राजेश कवडे,आदींसह सर्व नगरसेवक,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment