सा.क्रांतिवीर...नांदगाव महाविद्यालयाला उपविजेतेपद.!

नांदगाव-: संतोष कांदे
       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत नाशिक विभागीय आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल मुले स्पर्धा कला आणि वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद यांनी मीनाताई ठाकरे स्टेडियम,नाशिक येथे आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण १५ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये नांदगाव महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून बिटको कॉलेज, नाशिकरोड व देवळाली कॅम्प महाविद्यालय, नाशिक या संघांना हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना हा नांदगाव विरुद्ध सिन्नर महाविद्यालय यांच्यात झाला. या अंतिम सामन्यात नांदगाव महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सांघीक खेळाचे प्रदर्शन करून सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु या अंतिम सामन्यात नांदगाव महाविद्यालयाचा ८ विरुद्ध १० अशा दोन गोलच्या फरकाने सिन्नर महाविद्यालयाकडून पराभव झाला. या स्पर्धेमधून आंतरविभागीय स्पर्धेसाठी बालनाथ पवार, हेमंत औशिकर, विश्वास बिननर, व शुभम पैठणकर या खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली. यापुढील स्पर्धा प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, पुणे येथे दि.१९ व २० ऑक्टोबर रोजी होणार आहेत. या संघाला प्रा. दिनेश उकिरडे यांनी मार्गदर्शन केले. या विजयी संघाचे व खेळाडूंचे तसेच मार्गदर्शकांचे अभिनंदन मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस मा. निलीमाताई पवार, नांदगाव तालुका संचालक दिलीपदादा पाटील, महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल, प्राध्यापकवृंद,शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ