सा. क्रांतिवीर..नांदगाव तालुक्यात १४ वर्षाखालील कबड्डी स्पर्धा उत्साहात.

नांदगाव-: संतोष कांदे
      भारतीय खेळांमुळे सांघिक भावना निर्माण होऊन,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम उर्फ भावराव निकम यांनी केले.
      ते तालुका क्रिडा कार्यालय आयोजित १४ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी भालूरचे सरपंच संदीप आहेर,स्पर्धा प्रमुख संजय त्रिभुवन,सुधाकर कातकडे, वाल्मिक जाधव,प्रमोद चव्हाण,पी.यु.पाटील,श्री.ताडगे,श्रीमती देवरे,आदींसह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       श्री.निकम बोलताना पुढे म्हणाले की, रामायण,महाभारत काळापासून कबड्डी,हुतुतू,लिंगोरचा, विटी दांडू,कुस्ती असे सांघिक भावना वाढीस लावणारे क्रीडा प्रकार अस्तित्वात आहेत.मोबाईल किंवा बैठे खेळ न खेळता सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी मैदानावरचे खेळ खेळावेत असे ते शेवटी म्हणाले.
     १४ वर्षाखालील मुलांचे १७ संघ,व मुलींच्या ७ संघांनी यात सहभाग नोंदवला आहे.यावेळी मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवीयर हायस्कूल मनमाडच्या संघाने किसान माध्यमिक हायस्कूल वाखारीच्या संघाचा २३ गुणांनी पराभव केला तर मुलांचा अंतिम सामना अतिशय रोमांचक अटीतटीचा झाला टाकळी आश्रम शाळेच्या संघाने व्ही जे हायस्कूल संघाचा अवघ्या २ गुणांनी पराभव केला विजयी संघ नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नांदगांव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले तर प्रास्ताविक संजय त्रिभुवन यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ