सा.क्रांतिवीर..ऑनलाइन स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नाशिक जिल्हा अव्वल

सीईओ डॉ.गिते यांची प्रशासकीय शिस्तीसह,कामकाजात ही भरारी..

नांदगाव-: संतोष कांदे

स्वच्छ सर्वेक्षणात ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरल्याने औरंगाबाद येथे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे हस्ते गौरवण्यात आले.
    यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर, अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी डॉ.नरेश गिते यांनी कार्यभार हाती घेतल्यापासून अस्ताव्यस्त कारभार असलेल्या जिल्हा परिषद ला प्रथम प्रशासकीय शिस्त लावली.व नंतर कामकाजावर भर देत जिल्हा पिंजून काढला.व कामचुकारांना घराचा रस्ता ही दाखवला.घरकुल,कुपोषण आदी महत्वाच्या योजनांना गती ही दिल्याने त्यांच्या कार्याचा या निमित्ताने गौरव झाल्याचे मानले जात आहे.   
       जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेलकंदे यांनी हा सत्कार स्वीकारला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ