सा.क्रांतिवीर...पाणीप्रश्न झाला ज्वलंत..न्यायडोंगरी पेटले..

नांदगाव----संतोष कांदे

      काही वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या जलस्वराज्य पाणी पुरवठा योजनेत झालेला भ्रष्टाचार राजकीयदृष्ट्या संवेदनशील न्यायडोंगरी गावात चांगलाच गाजत असल्याचे चित्र सोशल मिडियातून दिसून येत आहे.आणि यात प्रस्थापित व्यक्तींची चुप्पी या वादाला हवा देणारी ठरत आहे.
         सुमारे आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या योजनेतून गावाला आजपर्यंत एकदाही पाणीपुरवठा झाल्याचे ऐकिवात नाही,मात्र या योजनेच्या पूर्णतेवर जवळपास एक कोटी आठ लाख रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे.नुकतीच झालेली ग्रामसभा याच जलस्वराज्य योजनेभोवती फिरल्याचे दिसून आले.
         या ग्रामसभेत सुमारे ३०० ग्रामस्थांनी याच योजनेशी संबधित प्रश्नांचा भडीमार केला.या ग्रामस्थांच्या गटाचे नेतृत्व गणेश आहेर यांनी केले,तर आहेर यांनी यावेळी गावातील सर्वच प्रस्थापित नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत या योजनेच्या चौकशीची मागणी केली.तसेच काही दिवसांपूर्वी गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे,आणि ही योजना गिरणा धरणातून साकारावी,अशी मागणी विद्यमान सरपंच गायत्री मोरे यांनी नुकतीच संबधित मंत्री महोदयांकडे केली आहे,त्यावर ही आहेर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
    

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ