सा. क्रांतिवीर...अत्यंत कमी कालावधीत चांगले कामकाज केल्यानेच समृद्धी सहकारी बँकेला 'अ' वर्गाचा दर्जा-सुहास कांदे

बँकेकडून सुमारे २ कोटी ५३ लाख २० हजारांचे कर्ज वाटप

नांदगाव-: संतोष कांदे

समृद्धी सहकारी बँकेने अत्यंत कमी कालावधीत कोट्यवधी रकमेचे कर्ज वितरण केले,आणि दुष्काळी परिस्थिती असतानाही ९९ टक्के रकमेची वसुली ही केल्याने बँकेला 'अ' वर्ग दर्जा मिळाला आहे.हे संचालक मंडळ व प्रशासनाचे यश आहे.असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केले.
       नांदगाव शहरातील चांडक संकुलमध्ये कार्यरत समृद्धी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.त्यावेळी अध्यक्षपदी बँकेचे मार्गदर्शक सुहास कांदे होते.
       यावेळी कांदे पुढे बोलताना म्हणाले की,अल्पावधीत बँकेने नांदगावकरांचा विश्वास संपादन केला आहे.त्याचे प्रतिक म्हणजेच बँकेत एका वर्षात कोट्यवधी रकमेच्या ठेवी जमा झाल्या आहेत,तसेच मनमाड शहरात ही बँकेची शाखा सुरू करण्यात यश मिळाले आहे,व एका वर्षात बँक लाखोंचा नफा मिळवू लागली आहे.या बँकेसाठी झटणाऱ्या चेयरमन,संचालक मंडळ,व प्रशासनाचे मी कौतुक करतो.असे कांदे शेवटी म्हणाले.
     तर बँकेचे चेयरमन तथा जिल्हा मजूर संस्थेचे प्रमोद भाबड म्हणाले की,बँकेचे १२८४ खातेदार असून,एकूण भागभांडवल ३२ कोटी २१ लाख इतके आहे.बँकेने आजपर्यंत २ कोटी ५३ लाख २० हजार रुपये कर्जवाटप केले आहे.सद्यस्थितीत ३ कोटी ९४ लाख ९८३७ इतक्या रुपयांच्या ठेवी आहेत.तर बँकेचा स्वनिधी ५२ लाख ४० हजार इतका आहे.बँकेची गुंतवणूक ७० लाख ६२ हजार इतकी आहे.वसुलीचा एन.पी.ए.३.२८ टक्के राहिल्याने बँकेला अ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.चालू आर्थिक वर्षात बँकेला सर्व तरतुदी वजा जाता ५ लाख ३० हजार रुपये नफा झाला आहे.त्याचबरोबर एन.पी.ए. शून्य टक्क्यांवर आणण्यास संचालक मंडळ व प्रशासन कटीबद्ध असल्याचे ही भाबड शेवटी म्हणाले.
      इतिवृत्त वाचन व सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री.महाले यांनी केले,तर आभार संचालक किरण देवरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ