सा.क्रांतिवीर....वकील संघाकडून 'त्या'घटनेचा निषेध.!

नांदगाव पोलिसांना निवेदन देत केली कारवाईची मागणी

नांदगाव-: संतोष कांदे

शहरातील जेष्ठ विधितज्ञ अड.गुलाबराव पालवे यांना रात्री अकरा वाजता एका माथेफिरू स्वयंघोषित डॉक्टरने अरेरावी,अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा जाहीर निषेध करत कडक कारवाईची मागणी नांदगाव वकील संघाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
       या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,सदर डॉ.महेंद्र सुखदेव गुमनर याच्यावर यापूर्वी ही अनेक गुन्हे दाखल आहेत,व तो पत्नी तसेच एका स्वयंघोषित गाव पुढाऱ्याच्या सांगण्यावरून सदर गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करत आहे.भविष्यात अड.पालवे यांना तो गंभीर इजा ही पोहचवण्याचा धोका आहे.त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
     या निवेदनावर अड.राजेंद्र दराडे,अड.सचिन साळवे,अड.एस. व्ही.पाटील,अड.पी. एम.घुगे,अड.शेख अंजर, अड.बी.आर.चौधरी,अड.बी.एस. पवार,अड.विजय रींढे,अड.महेश पाटील,अड.किरण गायकवाड,अड.सौरभ कासलीवाल,अड.आर.आर.आढाव, अड.जे.आर.कासलीवाल,अड.एम.जे.घुगे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ