सा.क्रांतिवीर...'हेच का ते अच्छे दिन.?

नांदगाव-: संतोष कांदे

   पेट्रोल,डिझेल,गॅस च्या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत,'हेच का ते अच्छे दिन.? असे म्हणत सतत देशप्रेमाची हाक देत अजून किती अंत पाहणार.? असा सवाल करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने भारत बंद च्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांना निवेदन सादर केले.
        माजी आमदार अड.अनिल आहेर,जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,काँग्रेस तालुकाध्यक्ष समाधान पाटील,आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
      देशात  पेट्रोल डीझेल आणि गँस चे भाव गगनाला भिडलेले आहेत,त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन होरपळून निघाले आहे.इंधनाचे दर हे जागतिक बाजार पेठेशी सलग्न असूनही त्यावर केंद्र आणि राज्यांनी अव्वा च्या सवा पद्धतीने कर लादले आहे.हे चुकीचे धोरण आहे नोटबंदी सारख्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाची किम्मत सामान्य जनतेने का मोजायची तसेच देशातील वाढत्या हिसाचाराने कळस घाटलेला आहे.संरक्षण खात्या सारख्या संवेदनशील विषयात राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीत महाप्रचंड घोटाळा झालेला आहे.
       देशाची वाटचाल एकाधिकारशाही आणि हुकुमशाही कडे झुकत चाललेली आहे. तसेच वाढत्या महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे या सर्व गोष्टींचा नांदगाव तालुका भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नांदगाव यांचे वतीने संयुक्त निवेदन  माजी आमदार अनिलदादा आहेर यांच्या हस्ते तहसीलदार भारती सागरे यांना  देण्यात आले याप्रसंगी जि.प सदस्या अश्विनी आहेर यांनी स्वयपाकाचा गँस महाग झाल्याने सर्वसामान्य गृहीनीना घर चालवणे  मुश्कील झाले असल्याने शासनाचा निषेध करीत मातीची चूल तहसीलदार यांना भेट देण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील, कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर पवार स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड,निंबादादा मोरे,सुकदेव मेंगाळ,महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मुनावर सुलताना, शहराध्यक्ष बाळासाहेब कवडे,वाल्मिक जगताप,अनिल जाधव,चिंधा बागुल,चंद्रकांत पवार,उदय पाटील,हरेश्वर सुर्वे, अशोक बद्रीनारायण गुप्ता, भास्कर शेवाळे, जगन्नाथ चोळके,रमेश पगार,विजय चव्हाण ,प्रकाश बोधक ,नारायण पवार,सचिन मराठे,शेषराव घुघे ,शब्बीर शेख,दत्तू पवार,गोरख आहेर,नवनाथ बोरसे,अयुब शेख,रामदास चव्हाण,अनिल सरोदे, सुनील खरारे,नितीन सोर ,डॉ.सागर भिलोरे ,भगवान डांगे ,अनिल खैरे,नाना गिरे,खातीब बबन शेख,अँड.अमोल आहेर ,दिलीप गरुड,सागर कांदळकर,दिलीप जाधव,रामभाऊ मंगा गिरे,आरिफ मन्सुरी,दारासिग बिडे,दामू मधे,यशवंत सरोदे,राजेंद्र लाथे,चांगदेव भिलोरे,भिवराज दाभाडे,गोविंद आरोटे,राजेंद्र आहेर, सचिन देवकते,  अमजद पठाण , प्रकाश बोधक, विठ्ठल नलावडे, युसूफ शेख, विठोबा मवाळ, , दत्तू पवार, सुमित गुप्ता, राजेंद्र लाठे, सतिष अहिरे, योगेश जाधव, हबीब शेख, पापा थॉमस, फिरोज शहा, बाबा पठाण, योगेश बोरसे, राजेंद्र आहेर, सागर आहेर, सचिन देवकते,  अमजद पठाण , प्रकाश बोधक, विठ्ठल नलावडे, युसूफ शेख, विठोबा मवाळ, , दत्तू पवार, सुमित गुप्ता, राजेंद्र लाठे, सतिष अहिरे, योगेश जाधव, हबीब शेख, पापा थॉमस, फिरोज शहा, बाबा पठाण, योगेश बोरसे, राजेंद्र आहेर, सागर आहेर,आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ