सा.क्रांतिवीर...रासेयो स्वयंसेवकांनी जुन्या पिढीच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे-नगराध्यक्ष कवडे
नांदगाव---संतोष कांदे
राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी जुन्या पिढीतील काही चांगल्या गोष्टींचे अनुकरण करून आपले व्यक्तिमत्व घडवावे, व मोठ्या योजना राबविण्यापेक्षा छोट्या आवाक्यात असणाऱ्या योजना राबवाव्यात.तसेच प्रत्येक स्वयंसेवकाने एक झाड दत्तक घेवुन राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावणे आवश्यक आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी केले.
ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील,प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल,उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे,प्रा.एस.एम.नारायणे,कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलीप दुधमल,प्रा.वाकचौरे,प्रा.श्रीमती शिंदे,प्रा.संदिप दौंड व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जीवनात महत्व व वर्षभर राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहीती प्रा.दुधमल यांनी दिली तर मनोगतात प्रा.मराठे म्हणाले की राष्ट्र विकासासाठी मुलांनी शासनाच्या विविध समाज विकासाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे तर शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी श्रमालाही प्रतिष्ठा मिळवून दिली पाहीजे तसेच भारत सरकारच्या स्वच्छता या मोहिमेत सहभागी होवुन स्वच्छ भारत अभियान राबवावे तसेच प्रत्येक स्वयंसेवकांनी शरीर व मन स्वच्छ ठेवुन आदर्श नागरिक बना असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल म्हणाले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीमती प्रतिभा जाधव यांनी केले तर आभार प्रा.संदिप दौंड यांनी मानले तर प्रा.शेंडगे,सरोदे,दिलीप अहिरराव,अनिल हातेकर,विलास आहेर,एम.व्ही.दिवटे,बी.बी.बच्छाव,सुरेश पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले यावेळी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
नांदगाव-: राष्ट्रीय सेवा योजना उदघाटन प्रसंगी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नांदगाव चे नगराध्यक्ष श्री राजेशजी कवडे व व्यास पीठावर प्रा डॉ एस आय पटेल उपप्राचार्य संजय मराठे श्री आबासाहेब पाटीलरा से यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा दिलीप दुधमल प्रा सुरेश नारायणे प्रा दौंड प्रा श्रीमती जाधव,(छाया-सुहास पुणतांबेकर)
Comments
Post a Comment