सा. क्रांतिवीर...महिला सरपंचाने गड राखला.!
ढेकूच्या सरपंच सौ.ज्योती भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताअभावी बारगळला.
नांदगाव -: संतोष कांदे
विकासाची कामे करताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत,मनमानी कारभार करतात,या टिपीकल कारणांचा आधार घेत नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील ढेकू ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी सरपंच सौ.ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला मात्र बहुमत सिद्ध न झाल्याने हे बंड थंड झाले.
या बाबत अधिक असे की,सरपंच व उपसरपंच विकासकामांची माहिती सदस्यांना देत नाहीत,मनमानी कारभार करतात,केलेल्या कामांत व आर्थिक व्यवहारात अनियमितता झाली आहे,अशा कारणांचा आधार घेत ग्रामपंचायत सदस्य नारायण सूर्यवंशी,भामाबाई गायके, चतुराबाई सूर्यवंशी,वैशाली राठोड,सरलाबाई सूर्यवंशी,मोतीराम राठोड यांनी सरपंच सौ.ज्योती भाऊसाहेब सूर्यवंशी,व उपसरपंच बळीराम चव्हाण यांच्या विरोधात तहसीलदार भारती सागरे यांच्याकडे अविश्वास दाखल केला होता.
यावर निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी,योगेश जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान घेण्यात आले.त्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार जनरल स्त्री राखीव पदावर अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी एक चतुर्थांश बहुमत आवश्यक आहे.आणि सदर ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य असल्याने बहुमतासाठी सात सदस्य आवश्यक होते,मात्र वाल्मिक शिंदे,बळीराम चव्हाण,हे दोन सदस्य गैरहजर राहिले.त्यामुळे बहुमत सिद्ध होऊ न शकल्याने हा अविश्वास ठराव बारगळ्याचे उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
या प्रसंगी उपस्थित भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्या गटाने मोठा जल्लोष यावेळी केला.
Comments
Post a Comment