सा.क्रांतिवीर...खासदार चव्हाण यांच्या आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांकडून तक्रारीचा पाऊस.!

तर गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप ने केले काय.? जनतेत उमटला सवाल.
    
नांदगाव-: संतोष कांदे

गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रशासनाच्या विरोधात जनतेबरोबर पदाधिकाऱ्यांनी ही सुरात-सूर मिसळल्याने मग या राज्यावर सत्ता कुणाची.? असा प्रश्न तालुक्यात चर्चेला आला आहे.
     नाशिक महानगर पालिकेत भाजपकडून आयुक्त मुंडे यांच्यावर येऊ घातलेला अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांनी शिताफीने टाळला.आणि  हे उदाहरण डोळ्यासमोर असताना ही भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्याच अधिपत्याखाली असलेल्या प्रशासनाला जनतेसमोर उघडे केल्याने 'तुम्हाला (भाजप) मग चार वर्षात प्रशासनावर अंकुश का ठेवता आला नाही.? असा प्रश्न आढावा बैठकीला उपस्थित सुज्ञ जनतेत उपस्थित झाला होता.
     तालुका कृषी विभागाच्या वतीने प्रभारी कृषी अधिकारी विजय पवार यांनी आढावा मांडला,तर त्यांचा आढावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला.गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांनी तालुक्यात ४ गावे व २२ वाड्यांना टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली.तर ४२ गाव पाणी पुरवठा योजनेबाबत अध्यक्ष बापूसाहेब जाधव व माजी आमदार संजय पवार यांनी सखोल माहिती देत 'या योजनेबाबत वीज वितरण कंपनी कशी सापत्न भावाची वागणूक देत आहे,याकडे खा.चव्हाण यांचे लक्ष वेधले,त्यावर खा.चव्हाण यांनी संबंधितांना याबाबत एक लेखी पत्र तत्काळ द्या,ते मी येत्या १० तारखेला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्रालयात असलेल्या बैठकीत दाखवून सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडतो.असे अभिवचन दिले.
        तर नांदगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांनी ५६ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची थकबाकी ३.४० पैसे या दराने पूर्ण भरून टाकल्याची माहिती यावेळी दिली.तसेच जिल्हा परिषदेने मात्र ७.२० पैसे दराने पैसे मागितले होते.
      जनतेच्या सर्वाधिक संतापाला तालुका वीज वितरण कंपनीला सामोरे जावे लागले.भाजपचे नेते तथा माजी आमदार संजय पवार यांनाही एक महिन्याचे वीज बिल ७२ हजार रुपये आल्याची माहिती दिली,तर तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी हा पूर्ण विभाग भ्रष्टाचाराने बरबटला असल्याचा जाहीर आरोप यावेळी केला,तसेच बाजार समिती संचालक हनुमंत सानप यांनी गेल्या आठ दिवसापासून वीज नसल्याने कळमदरी गाव अंधारात असल्याची माहिती यावेळी दिली,तर राजेंद्र देशमुख यांनी हे 'बैल आहेत.! यांना आरीने टोचले तरी यांच्यावर काहीच परीणाम होणार नसल्याचा स्पष्ट आरोप यावेळी केला.तसेच कनिष्ठ अभियंता गायत्री चव्हाण यांनी ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप लक्ष्मीनगर चे सरपंच बापूसाहेब जाधव यांनी केला.
     घाटमाथ्यावरील रोहिले बुद्रुक च्या सरपंचांनी आमचे गाव चार महिन्यापासून अंधारात असल्याची माहिती दिली,तरीही या ग्रामस्थांनी चार महिन्याचे वीज बिल भरून टाकल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खा.चव्हाण यांना दिल्याने खा.चव्हाण यांनी ही यावेळी संताप व्यक्त केला.या बैठकीला खा.चव्हाण यांच्यासह माजी आमदार संजय पवार,उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे,तहसीलदार श्रीमती भारती सागरे, गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ,मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर, नितीन पांडे, जिल्हा परिषद सदस्य आशा जगताप,पंचायत समिती सदस्या मधुबाला खिराडकर,श्रावण गोरे,भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,आदींसह शेकडो पदाधिकारी व लोक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ