सा.क्रांतिवीर..नांदगाव तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी हरेश्वर सुर्वे

नांदगाव---संतोष कांदे
     भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या,या निवडणुकीत नांदगाव तालुक्यातील चांदोऱ्याचे सरपंच हरेश्वर सुर्वे यांची बहुमताने निवड झाली आहे.
       तालुक्याचे माजी अड.अनिल आहेर यांनी सुर्वे यांना युवक काँग्रेसची तालुकाध्यक्ष पद उमेदवारी जाहीर केली होती. दि.१२ सदरची निवडणूक झाली या निवडणुकीत एकूण १८१ मतदारांनी मतदान केले.हरेश्वर सुर्वे यांनी १८१ पैकी १५० मते मिळवून दणदणीत विजय संपादन केल्याने त्यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
        मतमोजणी आज दि १३  रोजी नाशिक येथे पार पडली त्यांच्या निवडीबद्दल नांदगावचे माजी आमदार अड.अनिल आहेर नासिक शहर अध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर ,नांदगाव तालुकाध्यक्ष समाधान पाटील ,उदय पाटील,दिनेश चोथवे, स्वप्नील पाटील यांनी सत्कार केला.सुर्वे हे अनिलंदादा आहेर यांचे कट्टर समर्थक असून सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ