सा.क्रांतिवीर...अखेर नांदगावकरांची इच्छा फलद्रुप...महानगरी थांबली.!
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दाखवला हिरवा झेंडा...
नांदगाव---संतोष कांदे
'महानगरी' एक्स्प्रेस तर थांबली आहे,मात्र आता नांदगावकरांनी ही रेल्वेला येथून अधिक महसूल कसा मिळेल,याकडे लक्ष द्यावे.म्हणजेच गाडी बंद करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनासमोर येणार नाही.असा मित्रत्वाचा सल्ला दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिला.
नांदगाव रेल्वे कृती समिती व रेल्वे सल्लागार समितीच्या तसेच शहरातील सामाजिक संघटनेच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यासह खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रामाणिक प्रयत्न करत अप-डाऊन महानगरी एक्स्प्रेस ला नांदगाव येथे थांबा मिळवून दिला.आजपासून अधिकृत थांबा लागू झाल्याने या गाडीच्या स्वागतासाठी सर्व पक्षीय नेते,प्रवासी व नांदगावकर रेल्वे स्टेशनवर जमले होते,त्या निमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खा.चव्हाण बोलत होते.
खा.चव्हाण पुढे म्हणाले की,कुठल्याही गाडीला कुठल्याही स्टेशनवर थांबा द्यायचा असेल तर प्रथम उत्पन्नाची बाजू लक्षात घ्यावी लागते.आज पर्यंत सकाळी आठ वाजेनंतर येथून गाडी नसल्याने नांदगावकरांना सुमारे शंभर रुपये खर्च करून मनमाड पर्यंत धावपळ करत गाडी पकडावी लागत होती.आणि ही गाडी थांबावी असे अनेक निवेदन,मागण्या माझ्याकडे येत होत्या,त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री ना.पियुष गोयल यांच्याशी सकारात्मक चर्चा करून ह्या गाडीसाठी थांबा मिळवला,मात्र आता तुमची जबाबदारी आहे की,जास्तीत-जास्त महसूल येथून रेल्वे ला मिळायला हवा...असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी माजी आमदार संजय पवार,भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,हनुमंत सानप,नगराध्यक्ष राजेश कवडे,बाजार समिती सभापती तेज कवडे,मजूर संस्था उपाध्यक्ष प्रमोद भाबड,सुनील जाधव,नितीन पांडे,तुषार पांडे,सुमित सोनावणे,अड.सचिन साळवे,कैलास महाले,अमोल नावंदर,राजेश बनकर,संजय मोकळ,संतोष गुप्ता,खंडूशेठ दंडगव्हाळ, गुलाबराव पालवे,पोपट सानप,उमेश उगले,सुमित गुप्ता,धनराज बुरकुल,सुरेश शेळके, संजय सानप,भरत सूर्यवंशी,संदीप आहेर,किरण देवरे,समाधान पाटील,महावीर जाधव,मनोज चोपडे,राजेंद्र देशमुख,अंकुश कातकडे,मंगल भोसले,सजनतात्या कवडे, पुरोषत्तम निकम,राहुल अहिरे,कपिल तेलुरे,आदींसह शेकडो प्रवासी उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Comments
Post a Comment