सा.क्रांतिवीर..जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिक्षकदिन उत्साहात
गुरुजनांना सुट्टी देत विद्यार्थ्यांनी घेतला तास
नांदगाव-: संतोष कांदे
शहरातील जगन्नाथ ताराचंद कासलीवाल या इंग्लिश माध्यमाच्या विद्यालयात शिक्षकदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवसाचे औचित्य साधत गुरुजनांना सुट्टी देत इयत्ता ९ वी.व १० वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यादानाचे कामकाज बघत 'गुरुजी' होण्याचा आनंद लुटला.
यश सुराणा नामक विद्यार्थ्याने मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले,तर अन्य विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या तासिका घेतल्या.विद्यार्थ्यांचे हे कौतुक बघण्यासाठी अध्यक्ष सुनीलकुमार कासलीवाल,सचिव विजय चोपडा,महेंद्र चांदीवाल,जुगलकिशोर अग्रवाल,प्रशासक श्री.गुप्ता,प्राचार्या रेणू पिल्ले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment