सा.क्रांतिवीर..पिंपरखेड विद्यालयात शिक्षकदिन साजरा

नांदगाव-: संतोष कांदे

तालुक्यातील पिंपरखेड येथील पुंडलिक  पांडुरंग मवाळ विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली  राधाकृष्णन यांची जयंती  शिक्षक दिन म्हणून  साजरी करण्यात आली.
            यावेळी मुख्याध्यापक आर.आर.मवाळ  यांनी  अध्यक्षीय  भाषणातुन शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्राची माहीती विद्यार्थ्यांना दिली.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपुर्ण  दिवस  शाळा  चालवुन  शिक्षकाची  भूमिका  उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक  करण्यात आले.
         या प्रसंगी जी.यु.बोरसे, यांनी  मनोगतातुन शिक्षक दिनाचे महत्व सांगीतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.व्ही.कांदळकर  यांनी केले.एल.एन.जाधव,एम.जी.अहिरे,पठाडे सर,श्रीमती अलका  शिंदे, श्रीमती सायली गढरी ,आबा  सोनवणे  आदि  उपस्थित  होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ