सा.क्रांतिवीर...वस्तीवरच्या मुलांनाही आज 'मास्तर' झाल्याचा आनंद

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील दत्तवाडी शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने आगळा-वेगळा शिक्षक दिन साजरा

नांदगाव--:संतोष कांदे

     तालुक्यातील जळगाव बुद्रुक परिसरातील दत्तवाडी वस्तीशाळेत माजी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेत एक संस्मरणीय असा शिक्षकदिन साजरा करण्यात आला.
      मुख्याध्यापक म्हणून कुणाल गिते या माजी विद्यार्थ्याने दिवसभराचे कामकाज केले.तर आदित्य गिते,कुणाल गिते,पायल आव्हाड,मनिषा बोरसे या विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.गणेश आव्हाड याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
       सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभरात आलेले अनुभव व आपले मनोगत व्यक्त केले.
आदित्य गिते,कृष्णा गिते,अनिरुद्ध गिते,वैष्णवी गिते,वैष्णवी घुगे,कोमल गिते ,निकीता वाघ,हर्षदा बोरसे,आरती डिघोळे यांनी विविध विषयांचे अध्यापन करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
शाळेचे मुख्याध्यापक अमोल बच्छाव यांचेमार्फत शिक्षक म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांना कॅडबरी तर सर्व मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
      शिक्षक नवनाथ गिते यांचा विध्यार्थ्यांनी सत्कार केला.तर कोमल गिते हिने आभार मानले.शिक्षकांच्या वेशात मुलांचे  वर्तन आणि समजूतदारपणा  पाहण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ