सा. क्रांतिवीर..डी जे वर खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा उपक्रम आदर्शवत-पोलीस निरीक्षक धूसर
मनमाड शहरातील मोदकेश्वर गणेश मंडळाचा उपक्रम
नांदगाव-: संतोष कांदे
डी जे वर वायफळ खर्च करून पैशाचा चुराडा होतोच ; पण ध्वनी प्रदूषणाची ही मोठी समस्या निर्माण होते,त्यामुळे मोदकेश्वर गणेश मंडळाने या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारीचे पालन केले आहे,असे प्रतिपादन मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत धूसर यांनी केले.
शहरातील आय.यु.डी. पी.भागातील मोदकेश्वर गणेश मंडळाने डीजे ला फाटा देत त्या रकमेतून निमोण रस्त्यावरील प्राथमिक आश्रम शाळेत (दहेगाव(म) ता.चांदवड) जाऊन तेथील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला.त्या प्रसंगी अध्यक्षपदावरून पो.नि.धूसर बोलत होते.ते पुढे म्हणाले की,एक दोन तासांच्या डीजे च्या दणदणाटाने ध्वनी प्रदूषण अटळ असतेच,मात्र त्यातून अनेक आजार ही जेष्ठ नागरीक, लहान बालके,यांना होऊ शकतात.परिणामी मोदकेश्वर गणेश मंडळाचा आदर्श इतर ही गणेश मंडळांनी घेणे काळाची गरज आहे.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी युवा सेनेचे सरचिटणीस स्वराज देशमुख,पोलीस उपनिरीक्षक शेख,मंडळाचे मार्गदर्शक श्री.कसाब,संस्थापक देवेंद्र घटे, अध्यक्ष अमोल जाधव,कार्याध्यक्ष आशिष चव्हाण,सदस्य श्रीराज कासार,अक्षय शिंपी,अरबाज अख्तर,अथर्व निकुंभ,सार्थक महाले,शुभम साक्रे, खजिनदार अक्षय घटे,या प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.नंदू पगार,शेवाळे यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment