सा.क्रांतिवीर...शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्ती बनवत कासलीवाल विद्यालयाची पर्यावरण रक्षणाची हाक

पर्यावरणाची जनजागृती, कासलीवाल शाळेत बनविले शाडू मातीचे गणपती

नांदगाव-: संतोष कांदे

    शहरातील सौ. क. मा. कासलीवाल विद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्ती बनवून काळाची गरज असलेल्या पर्यावरण रक्षणाची हाक दिली जात आहे.
       या इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेत ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मूर्ती बनवल्या. या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना या गणेश उत्सवात मुले घरी करणार आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद लुटला. या कार्यशाळेचे मार्गदर्शन श्रीमती धन्वंतरी देवरे, श्री जगताप सर, फणसे ईश्वर व पाटील कमलेश या शिक्षकांनी केले.
      संस्थचे अध्यक्ष सुनिलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सरचिटनिस प्रमिला कासलीवाल, संचालक महेंद्र चांदीवाल यांनी मुलांनी बनविलेल्या गणेश मूर्ती बघून कौतूक केले. मुख्याध्यापक श्री व्ही पी सावंत यांनी पर्यावरणाचे महत्व सांगून मुलांना शाडुच्याच मातीचे गणपती बसविन्याचे आव्हान केले.  यासाठी  श्री.थोरात सर श्रीमती. पठाण, चोळके, पवार, निकम, देशमुख, शिंदे, सुरळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ