सा.क्रांतिवीर...सौ.क.मा.कासलीवाल विद्यालयात गोपाळकाला उत्साहात
नांदगाव-:संतोष कांदे
शहरातील सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात बालगोपाळानी राधाकृष्णाच्या वेशभूषेत दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला.'गोविंदा रे गोपाळा 'या गाण्यावर नृत्य केले.तसेच शालेय प्रांगणात विद्यार्थी व पालकांनी उत्साहात फुगड्या देखील खेळल्या.
गोपाळ काल्याचे महत्त्व मुख्याध्यापक व्ही.पी.सावंत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या प्रसंगी संस्थचे अध्यक्ष सुनिलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सरचिटणिस प्रमिला कासलीवाल, संचालक महेंद्र चांदीवाल यांनी कौतूक केले. यासाठी श्री. जगताप सर, फणसे सर, पाटील सर,थोरात श्रीमती. देवरे, पठाण, चोळके, पवार, निकम, देशमुख, शिंदे, सुरळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment