सा.क्रांतिवीर...पारंपरिक खेळांतून सामाजिक एकता वाढीस-युवा नेते दर्शन आहेर

न्यायडोंगरी येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नांदगाव-: संतोष कांदे

आपल्या ग्रामीण भागातल्या पारंपरिक खेळांमधून सामाजिक एकता वाढीस लागते,आणि परस्परांमधील संबंध ही वाढीस लागतात असे प्रतिपादन युवा राष्ट्र सामाजिक संघटनेचे संस्थापक दर्शन आहेर यांनी केले.
      नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील तारू नाईक तांडा येथील जय सेवालाल गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
       या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ११००१ (डॉ.राजेंद्र आहेर), द्वितीय बक्षीस ७००१ (माजी सरपंच डॉ.शरद आहेर),तृतीय बक्षीस ५००१ (जय सेवालाल) ठेवण्यात आले असून,परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गोरख जाधव,मलखान राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ