सा.क्रांतिवीर..गाव पातळीवरील सरपंच ही संपर्क कार्यालय सुरू करतात तेव्हा..
मुळडोंगरीच्या सरपंच सौ.मंगला नावंदर यांचा अभिनव प्रयोग...
नांदगाव-: संतोष कांदे
खासदार,आमदार,किंवा तालुका,जिल्हा पातळीवरील पदे भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे संपर्क कार्यालय असल्याची बाब सर्वपरिचित आहे,मात्र ग्रामीण भागात एखाद्या सरपंचाने संपर्क कार्यालय उभारल्याची दुर्मिळ घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे.
मूळडोंगरीच्या विद्यमान सरपंच सौ.मंगला प्रकाशचंद्र नावंदर या जनतेतून सरपंच झालेल्या महिलेने ही अभिनव कल्पना राबवली आहे.या संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख कांदे यांनी सौ.नावंदर यांच्या या कल्पक बुद्धीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाप्रमुख किरण देवरे,जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,शहरप्रमुख सुनील जाधव,मजूर संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद भाबड,अमोल नावंदर,संदीप जेजुरकर आदी उपस्थित होते.
या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध आवश्यक दाखले,तसेच अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे सरपंच सौ.नावदंर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment