सा.क्रांतिवीर..नांदगाव महाविद्यालयात भारतीय संस्कृती परीक्षेचे बक्षीस  वितरण संपन्न

नांदगाव-: संतोष कांदे
    
    आयुष्य कसे  असावे आपले व्यक्तिमत्व कसे असले पाहिजे हे महत्वाचे आहे यावर व्यक्तीने विचार केला पाहिजे,स्वामी विवेकानंद यांनी भारतीय  संस्कृतीचे दर्शन  आपल्या शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत भारत मातेच्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व जगाला कृतीतून दाखवून दिले.असे प्रतिपादन मालेगाव केंद्राचे उपनगर प्रमुख सुरेश शांताराम चौधरी यांनी केले.
        ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या  कला,वाणिज्य  व विज्ञान  महाविद्यालयात  स्वामी विवेकानंद  केंद्र कन्याकुमारी शाखा मालेगाव केंद्र व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय  संस्कृती स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते त्या परिक्षेत पास झालेल्यांचे बक्षीस  व प्रमाणपत्र वितरण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल होते तर यावेळी व्यासपीठावर विवेकानंद  केंद्राचे प्रमुख  व्यवस्थापक तथा काकाणी विद्यालयाचे  माजी प्राचार्य संजय श्रीकृष्ण पाठक,नांदगाव  केंद्राचे प्रमुख बी.के.ठोंबरे,सामाजिक कार्यकर्ते  संजय मोकळ,पत्रकार संजीव धामणे,प्रा.सुरेश नारायणे,प्रा.मापारी,प्रा.वाकचौरे उपस्थित होते.
       यावेळी  पाठक सरांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याची ओळख  करून दिली व परीक्षेत प्रथम रूपाली संजय पवार द्वितीय कोमल विजय हिरे,तृतिय राणी राजाराम चौधरी तर उत्तेजनार्थ कल्याणी ज्ञानदेव पवार,तेजल प्रभाकर  पगार,हर्षदा राजेंद्र मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र  वितरण करण्यात आले व परीक्षेत  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले  यावेळी  स्वामी विवेकानंद  यांच्या शिकागो येथे  केलेल्या भाषणाला ११ सप्टेंबर रोजी १२५  वर्ष झाल्याकारणाने त्यांचे भाषण करण्याची एक आगळीवेगळी  स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करून त्यांना  प्रथम ५०१,द्वितिय ३०१ तृतिय २०१  व उत्तेजनार्थ १०१ रूपयांचे बक्षीस देण्यात येईल असे  प्रमुख वक्ते चौधरी यांनी जाहीर केले या उपक्रमाचेही प्राचार्यांनी कौतुक केले या कार्यक्रमाचे  सुंदर असे  संयोजन नांदगाव केंद्राचे प्रमुख बी.के.ठोंबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  प्रा.एम.आर.गावले यांनी केले तर सामाजिक  कार्यकर्ते संजय मोकळ यांनी आभार मानले.
   शुभम आहेर,बाबा निकम,सुभाष शेवाळे,सुरेश पवार,यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी  महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ