सा.क्रांतिवीर..आतातरी प्रशासनाने जागे व्हावे.!
राष्ट्रवादी काँग्रेस ने करून दिली जाणीव..
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे,पिके शेवटची घटका मोजत आहेत.आणि याची जाणीव आमदार पंकज भुजबळ यांनी एका बैठकीद्वारे शासनाला करून दिली आहे.मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ने केली आहे.
ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे,दुष्काळासंदर्भात उपाय योजना करण्यात याव्यात यासंदर्भात आमदार पंकज भुजबळ यांनी टंचाई बैठक एक महिना आधी घेवून सुचना केलेल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाने वारंवार निवेदन देवून विषयाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेले आहे. परंतु प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे दुष्काळाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी व उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी तहसिलदारांना निवेदन देवून याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मागील वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद देवून शेतक-यांना नुकसान भरपाई दोन आठवड्यात देण्याचा प्रयत्न केला जाइल त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडावेत असे सांगितले. ४२ खेडी पाणी पुरवठा योजना वीज बिल देयके, दुष्काळावरील उपाय योजना आदी विषय शासन दरबारी मांडले जातील असेही तहसिलदार यांनी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, कार्याध्यक्ष रमेश पगार, शहर उपअध्यक्ष सतीष अहिरे, स्वीय सहायक अशोक गायकवाड विजय पाटील, सचिन देवकते, नारायण पवार, अमजद पठाण नगरसेवक मनमाड, प्रकाश बोधक, विठ्ठल नलावडे, युसूफ शेख, विठोबा मवाळ, गोरखनाथ आहेर, दत्तू पवार,(उप जिल्हा अध्यक्ष) सुमित गुप्ता, राजेंद्र लाठे, योगेश जाधव, हबीब शेख, पापा थॉमस, फिरोज शहा, बाबा पठाण, योगेश बोरसे, राजेंद्र आहेर, सागर आहेर, भावडू गिते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment