सा.क्रांतिवीर...नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा-शिवसेना
तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांना निवेदन सादर
नांदगाव ---संतोष कांदे
सुमारे दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी कोलमडून पडला आहे.खरीप पेरणीसाठी झालेला खर्च सोडाच ; पण बँका, पतसंस्था,खाजगी सावकार यांची देणी कशी फेडणार.? या चिंतेने ग्रासले आहे,परिणामी आत्महत्या सारख्या वाईट विचाराकडे परावृत्त होऊ शकतो.म्हणून शासनाने सारासार विचार करून नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे व शिवसेना पदाधिकारी यांनी तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख कांदे यांच्या समवेत जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे,माजी पंचायत समिती सभापती विलासराव आहेर,तालुकाप्रमुख किरण देवरे,शहरप्रमुख सुनिल जाधव,पंचायत समिती सभापती सौ.विद्या पाटील,पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब हिरे,जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,जिल्हा मजूर संस्था संचालक प्रमोद भाबड,अॅड. सचिन साळवे,युवासेना शहर प्रमुख गोलु बागोरे यांचा समावेश होता.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,तालुक्यातील सर्व महसूल मंडळात २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्याने पिके शेवटची घटका मोजत आहेत.त्यामुळे कृषी विभागाकडून पिकांचे पंचनामे करून,दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी, पिकपहाणी ५० पैशाच्या आत लावावी,आहे ते टँकर सुरू ठेवून जनावरांसाठी ही पाण्याचे स्वतंत्र टँकर सुरू करावे,तसेच जनावरांच्या चाऱ्याची ही व्यवस्था करावी.असे ही शेवटी निवेदनात म्हटले आहे.
Comments
Post a Comment