सा.क्रांतिवीर..कांदा करतोय...वांदा.!
नांदगाव-: संतोष कांदे
मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा सहा महिने सोन्यासारखा जपूनही वांदा करतोय,'राजाने मारले,पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करावी.? अशी गत बळीराजाची झाली आहे.
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (दि.२६) सकाळ सत्रात २ हजार ८२० क्विंटल कांदा आवक झाली.त्यास सरासरी ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.यातून शेतकऱ्यांना १६ लाख ९२ हजार रुपये प्राप्त झाले.तर नव्या मका पिकांची १४० क्विंटल आवक झाली.या मका पिकास प्रति क्विंटल सरासरी १ हजार ३१६ रुपये भाव मिळाला. त्यातून शेतकऱ्यांना १ लाख ८४ हजार २४० रुपये प्राप्त झाले.
प्रतिक्रिया-: तेज कवडे,सभापती -
शेतमाल विक्रीनंतर शेतमालाचे पेमेंट रोखीने अथवा त्याच तारखेचा बेअरर चेकद्वारे अदा केले जात असून २४ तासाचे आत आपले पेमेंट घेऊन जावे याबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment