सा.क्रांतिवीर..संगणक परिचालक मानधन तत्काळ अदा करावे,यासाठी कामबंद आंदोलन सुरू

गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांना दिले निवेदन

नांदगाव---संतोष कांदे

शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्र परीचालकांचे मानधन रखडल्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
                   ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी १४ वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सीएससी –एसपीव्ही कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रू जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षात मात्र ३ ते ६ हजार पर्यंत मानधन मिळते. ते मानधनसुध्दा ६ महिन्यापासुन मानधन रखडले आहे.
        या परीचालकांच्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाज ठप्प होणार असुन विविध प्रकारचे ऑनलाईन दाखले,उतारे साठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा “ड” घरकुल यादीचा सर्वे देखील जिल्हातील संगणक परीचालक करीत होते. काम बंद आंदोलनामुळे आवास योजनेच्या कामावर देखील परीणाम झालेला आहे. एकीकडे शासन डिजिटल इंडिया , डिजिटल महाराष्ट्र करत आहे. परंतु डिजिटल इंडिया करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परीचालक हा महत्वाचा घटक आहे. संगणक परीचालकांनी अनेक आंदोलने केली आहे. परंतु शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत सीएससी –एसपीव्ही कंपनीला पाठीशी घालुन संगणक परीचालकांवर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
          जिल्हयातील संगणक परीचालक  यांचे एप्रिल,मे,जून २०१७  चे मानधनाचे पैसे कंपनीला जाऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी  कंपनीच्या बोगस कारभारामुळे अजून मानधन झाले नाही,  ग्रामपंचायत मधून मागील महिन्याचे चेक जिल्हा परीषदेला जमा करून पण अद्याप जून महिन्यापर्यंतचे मानधन झालेले नाही.जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत जुलै २०१८  पासून पुढील  महिन्याचे चेक पूर्ण ग्रामपंचायत चे अद्याप जमा झालेले नाही त्यामुळे पुढील  मानधन कसे होणार व कधी होणार याची शाश्वती नाही. काही संगणक परीचालकांचे इंनव्हाईस डीम मध्ये गेलेले आहे.त्यामुळे सदर महिन्यातील मानधन झालेले नाही. तरी सर्व थकीत मानधन संगणक परीचालकांना मिळावे . तसेच पंचायत समिती मधील संगणक परीचालकांना आपले सरकार प्रकल्पामध्ये सामावुन घेणे अशी माहिती नाशिक जिल्हा सरचिटणीस सोमनाथ उडकुडे , नांदगाव तालुका अध्यक्ष दिपक त्रिभुवन , उपाध्यक्ष विजय आहेर सचिव राकेश ताडगे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ