सा.क्रांतिवीर...जळगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने आज होणार गौरव.!
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शीतल सांगळे यांचे हस्ते वितरण
नांदगाव-: सन २०१८-१९ सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेने काल (दि.४) जाहीर केले आहेत.त्यात नांदगाव तालुक्यातून फक्त जळगाव बुद्रुक प्राथमिक शाळेचे शिक्षक दिपक हिरे यांचा समावेश असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेकडून गत वर्षीचे १५ पुरस्कार तर यंदाचे १५ अशा ३० शिक्षकांना आज गौरवण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शीतल सांगळे,तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते,यतीन पगार,नयना गावित,मनीषा पवार,अर्पणा खोसकर, सुनीता चारोस्कर,धनराज महाले,आत्माराम कुंभार्डे यांची असणार आहे.
Comments
Post a Comment