सा.क्रांतिवीर..हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस ही मैदानात
निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांनी स्वीकारले निवेदन
नांदगाव-: संतोष कांदे
तालुका प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता तालुक्यातील पाच ही महसूल मंडळ कार्यक्षेत्रातील पिकांचे वस्तुनिष्ठ अहवाल मागवून वरिष्ठ शासन पातळीवर पाठवावे,जेणेकरून तालुका दुष्काळी घोषित केला जाईल.अशा आशयाची मागणी काँग्रेसचे माजी आमदार अड.अनिल आहेर,जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,तालुक्याची पैसेवारी वास्तव डोळ्यासमोर ठेवून २५% ते ३०% असावी.तालुक्यात काही अपवाद वगळता संबंध तालुक्यात जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला.त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या,परंतु पेरण्या झाल्यानंतर सुमारे दोन महिने पावसाने दडी मारली परिणामी सर्व पिके करपून गेली.सर्व पेरणी वाया गेली व मागच्या आठवड्यात रिमझिम पाऊस आल्याने पिकांना हिरवेपणा आला परंतु पिकांची वाढ खुंटली आहे,पिकांचे जे उत्पन्न मिळावयास हवे, ते आता मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही.
शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुका दुष्काळी केव्हा जाहीर होतो,याकडे लक्ष लागले आहे.उत्पादन २५% ते ३०% पेक्षाही कमी येणार असल्याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावांची पैसेवारी ही वास्तवाला धरून २५% ते ३०% पैसेच्या आत असावी.कारण की आता पाऊस झाला तरी उत्पन्नात वाढ होणार नाही त्यामुळे तहसिलदारांनी वरील बाबींचा विचार करून तालुक्यातील पाचही मंडळ अधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवून कार्यवाही करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर यांनी केली.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर,काँग्रेस तालुकाध्यक्ष समाधान पाटील,कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर पवार ,तलाठी संघाचे माजी अध्यक्ष जगनाथ चोळके, चिंधा बागुल, हरेश्वर सुर्वे, सुनील निकम,नवनाथ बोरसे,लक्ष्मीकांत कापुरे, नरहरी थेटे, नवनाथ सोळुंके,आदिसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment