सा.क्रांतिवीर..न्यायडोंगरी गावाला गिरणा धरणातूनच पाणी पुरवठा योजना साकारावी-शशिकांत मोरे
पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांच्याकडे केली मागणी
नांदगाव----संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या न्यायडोंगरी गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली असून,ही योजना गिरणा धरणातूनच कार्यान्वित व्हावी.! अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी पाणीपुरवठा मंत्री ना.लोणीकर यांची भेट घेऊन केली.
या बाबत अधिक असे की,गावाचा पाणीप्रश्न अनेक योजना असतांनाही भेडसावत असतो.शाश्वत पाणी असलेल्या उदभवातून पाणी पुरवठा योजना साकारली,तर गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल,या विचारातून मोरे यांनी ग्रामपंचायतीचे लेखी पत्र ना.लोणीकर यांना सादर केले.तसेच गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर केली म्हणून आभार ही व्यक्त केले.व ही योजना मंजूर होण्यासाठी शिफारस दिलेल्या आमदार पंकज भुजबळ,ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांचे ही आभार मानले आहेत.
यावेळी शशिकांत मोरे,ग्रामपंचायत सदस्य विष्णू गायकवाड,निवृत्ती गुंजाळ,बापू बाचकर, उपस्थित होते.
Comments
Post a Comment