सा.क्रांतिवीर...युवा फाउंडेशन..जनसेवेची पंरपरा यंदाही अखंडीत.!
जैन धर्मशाळेत मोफत आरोग्य तपासणी...तर आज सावता मंदीर येथे रक्तदान शिबीर ..लाभ घेण्याचे आवाहन
नांदगाव---संतोष कांदे
शहरातील नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यासह,लोकोपयोगी मोफत शिबीर घेत युवा फाउंडेशनने लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आपले कार्य यंदा ही सुरू ठेवले आहे.आज रोजी (दि.१८) रक्तदान तर २० तारखेला भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित सोनावणे यांनी दिली आहे.
नागरिकांना विविध शासकीय सेवा देण्यात कसूर झाल्यास निवेदन,आंदोलन करत त्या सेवा मिळवून देण्यास युवा फाउंडेशन कायम पुढाकार घेत असते.त्याचबरोबर नागरिकांना बरोबर घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात ही ते अग्रेसर असतात.शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या चांगल्या योजनांना प्रतिसाद देत जनजागृतीचे कार्य ही ते आपल्या पद्धतीने करत असतात.
यंदाच्या गणेशोत्सव निमित्ताने त्यांनी शहरातील जैन धर्मशाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन केले आहे.त्यासाठी गुरुवार हा दिवस निवडला आहे,याचे कारण या दिवशी आठवडे बाजार असल्याने तालुक्याच्या खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने येणाऱ्या ग्रामीण जनतेला ही याचा लाभ घेता येईल,असा उदात्त हेतू यामागे आहे.
नाशिकस्थित सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल,व विघ्नविनायक राजा गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या तपासणी शिबिराचे आयोजन आहे.या शिबिरात इ.सी.जी.,फुफ्फुसांची तपासणी,रक्तदाब तपासणी,डॉक्टरांचे मार्गदर्शन,बॉडीमास इंडेक्स,मधुमेह तपासणी,ब्लड ऑक्सिजन तपासणी,उंची व वजन अशा विविध तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून,त्यासाठी १० रुपये नाममात्र नोंदणी फी ठेवण्यात आली आहे.
या शिबिरासाठी अस्थीरोग तज्ञ डॉ.सागर काकतकर, मधुमेह व रक्तदाब तज्ञ डॉ.सुबोध पाटील,स्त्रीरोग तज्ञ डॉ.पूजा कदम,दंतचिकित्सक डॉ.उदय मेघावत आदी तज्ञ डॉक्टर तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.तर महावीर मेडिकल,श्रीराम मेडिकल,मेडिकल असोसिएशन,डॉक्टर असोसिएशन यांचे सौजन्य या शिबिरासाठी लाभले आहे.शिबीर यशस्वीतेसाठी युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.
दरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालय व नांदगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सावता महाराज मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून एका पुण्यकर्माचे भागीदार व्हावे,असे आवाहन सुमित सोनावणे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment