सा.क्रांतिवीर...राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षबांधणी जोरात

नांदगाव-: संतोष कांदे

नांदगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या व सक्षम करण्याच्या निर्धाराने प्रत्येक गावात जावून गावातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष बांधणी संदर्भात चर्चा केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून १६ सप्टेंबर  रोजी तळवाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा, गावपातळीवर कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली.
          गावातील गरजूंना घरे, बस स्टँड वर निवारा शेड, बंधारे बांधणे, मुख्यरस्ता व शिवार रस्ते आदी विकास कामांबाबात चर्चा झाली. या बैठकीला तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, शहर उप अध्यक्ष सतिष आहिरे, राजाराम घुगे, रमेश घुगे, काळू निकम, मोहन उगलमुगले, सर्जेराव साताळे, जगन उगलमुगले, हरिदास घुगे, समाधान उगले, गोरख वाघ, अण्णा गिते, लालचंद उगले, सुनिल पवार, गुलाब सोनवणे, दत्तू घुगे, विकास आव्हाड, बापू कोळकर, सोमनाथ घुगे, सुनिल उगले, खंडू पवार, हनुमान घुगे, ऋषिकेश दराडे, प्रशांत सानप, पवन निकम, राहुल घुगे, समाधान चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ