सा.क्रांतिवीर...तुला पुढच्या साली अंघोळ घालू..असा वायदा करत पोळा सण अत्यंत निरुत्साहात साजरा

नांदगाव-: संतोष कांदे

बळीराजाचा जिवलग सर्जा-राजा चा आज सण... मात्र निसर्गाने या दोन जिवलगा च्या दोस्तीत फूट पडेल..असेच चित्र पुढ्यात वाढून ठेवले आहे.पण काय करणार.?...काळजावर दगड ठेवत आपल्या जिवलग मित्रासाठी बैल-पोळा साजरा झाला.
      मृग नक्षत्रापासून हुलकावणी देत असलेला वरुण राजा आजतरी बरसेल, अशी अपेक्षा होती.कारण ह्या दिवशी वरुण राजा बरसल्याची साक्ष अनेक वयोवृद्ध देत असतात.मात्र काळ बदलला....माणसे बदलली...मग निसर्गाने कितपत आपल्या वचनावर ठाम रहावे...यालाही मर्यादा आहेतच ना.!
      निसर्गाच्या लहरी पणावर टिका करणारा मनुष्य स्वतःच्या निसर्ग विरोधी केलेल्या कृती सोयीस्करपणे विसरतो.हे ही तितकेच खरे.! मग तो बळीराजा असो वा व्यावसायिक..या सर्वांचेच निसर्गविरोधी वागणे..आणि त्याचा त्रास मात्र मुक्या प्राण्यांना भोगावा लागत आहे,कुठलीही चूक नसताना....

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ