सा.क्रांतिवीर...गोर-गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देत स्व.अण्णासाहेब आहेर यांना आदरांजली
नांदगाव---संतोष कांदे
नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अड.अनिल आहेर यांचे वडील स्व.गंगाधर (अण्णासाहेब) आहेर यांची पुण्यतिथी तालुक्यातील गरजू रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करत सेवाभावी वृत्तीने साजरी करण्यात आली.
काल (दि१५) रोजी न्यायडोंगरी येथील कै. विजयमामा आहेर कनिष्ठ महाविद्यालय परिसरात असलेल्या समाधी स्थळावर कै. पुतळ्यास अभिवादन करून,विविध लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
गावातील डॉ.शरद आहेर यांच्या ध्वनंतरी रुग्णालयात मोफत नेत्ररोग तपासनी शिबीर घेण्यात आले.त्या शिबीरात नाशिकच्या प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञामार्फत नेत्रतपासणी करण्यात आली.गाव तसेच परिसरातील एकूण ६oo रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात नेत्रदोष असणाऱ्या १६० रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले.तर १७० रुग्णांना नेत्रशस्त्रक्रियेसाठी नाशिक येथील नामांकित तुलसी हॉस्पीटलमध्ये नेण्याचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी गावातील व पंचक्रोशील नागरीक बहूसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment