सा.क्रांतिवीर...लोकनेते स्व.अण्णासाहेब आहेर यांचा स्मृतीदिन साजरा
नांदगाव---संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावचे सुपुत्र स्व.गंगाधर (आण्णासाहेब) शिवराम आहेर यांचा १२ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आज (दि.१५) रोजी सकाळी ८ वाजता लोकनेते कै.अॕड.विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्यु.काॕलेज नायडोंगरी ता.नांदगाव जि.नाशिक या विद्यालयात असलेल्या समाधीस्थळी संपन्न झाला.
यावेळी कै.शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.निळकंठ मोतीराम पाटील (सुदाम काका), सरचिटणीस श्री.विलासराव विजय आहेर,संचलिका सौ.पल्लवीताई विलास आहेर, श्री,उज्ज्वलराव आहेर,अॕड.रंजनकुमार आहेर,डाॕ.नवरे साहेब, श्री.सदाशीव सरगर, तसेच नायडोंगरी , परधाडी,पिंपरी,हिंगणे,रणखेडा येथील मान्यवरांसह विद्यालयाचे प्राचार्य,पर्यवेक्षक, शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment