सा.क्रांतिवीर..सही पोषण...देश रोशन..या उपक्रमास सुरुवात

नांदगाव----संतोष कांदे

राज्यासह,जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनासह,राज्य सरकार ही अधिक प्रयत्नशील झाले आहेत.त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथेही या उपक्रमाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
    दि.१ ते ३० सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत कुपोषण हटवण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत आहे.ग्रामविकास विभाग (पंचायत राज),सार्वजनिक आरोग्य विभाग,पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,माहिती व जनसंपर्क विभाग,शालेय शिक्षण विभाग,आदिवासी विकास विभाग,अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कामास लावले आहे.
     या सप्टेंबर-२०१८ पोषण महिन्यातील कार्यक्रम कृती आराखडा आखण्यात आला आहे.त्यात १ ल्या आठवड्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन यासह माहिती व प्रसिद्धी साहित्याचे वाटप,प्रभात फेरी,पोषण विषयावर शाळेमध्ये चित्रफीत दाखवणे,० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे,जिल्हा /उप विभागीय स्तरावर अभिसरण कृती आराखडा तयार करणे आदी उपक्रमाचा समावेश आहे,तर दुसऱ्या आठवड्यात ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस आयोजन,महिलांसाठी योगा आयुष मार्फत आयोजन,आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका,बचत गटांमार्फत चांगल्या आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून कार्यशाळा,० ते ६ वयोगटात बालकांचे वजन व छाननी,अंगणवाडी केंद्र इमारतीतील शौचालय करिता पाण्याची उपलब्धता,यासह अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम आखण्यात आले आहेत.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद चे  मुख्य   कार्यकारी   अधिकारी डॉ.नरेश गिते, उप मुुख्य    कार्यकारी  अधिकारी दत्तात्रय मुुंडे, बाल विकास     प्रकल्प    अधिकारी  संदीप गवळी,मुख्य सेविका सुनिता पाचपांडे     यांच्या     मार्गदर्शना   खाली  अंगणवाडी   सेविका सौ.मंगल कांदे,सौ.विजया   गिते, सौ. छाया सोनावणे   प्रयत्नशील आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ