सा.क्रांतिवीर...बातमी सौ.क.मा.कासलीवाल विद्यालयात कार्यशाळा संपन्न

नांदगाव-: संतोष कांदे

   शहरातील सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पुरक गणेश मुर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा संपन्न झाली.
           मुख्याध्यापक  राजेंद्र खरोटे यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी शाडू मातीचे गणेश मुर्ती  तयार करा व शाडू मातीचे गणेश मुर्तीचीच स्थापना करावी असे आवाहन केले. हया कार्यशाळेत ५५० विद्यार्थी  सहभागी झाले. मुर्ती बनविण्यासाठी  राहूल पारखे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी  मूर्ती निर्मितीचा  आनंद घेतला . विद्यार्थ्यांनी शाडू मातीचे गणेश मुर्तीचीच स्थापना करायची असा संकल्प करुन पर्यावरण पुरक संदेश दिला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक  संजय त्रिभुवन ,राहूल पारखे ,संदिप आहेर, मनोज साळुंखे,राहुल आहेर शरयू साळुंखे  हर्षदा भालेराव रूपाली मालकर   निकम किशोर बागले गोरख डफाळ  गायकवाड  गौरव जोशी केतन दळवे यांनी सहभाग घेतला.
      संस्थेचे चेअरमन सुनिल कुमार कासलीवाल  सचिव विजय चोपडा सौ प्रमिलाताई कासलीवाल जूगलकिशोर अग्रवाल,महेंद्र चांदीवाल प्रशासक श्री गुप्ता   व सर्व संचालक मंडळ यांनी
विद्यार्थ्यांचे  कौतुक करून अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ