सा.क्रांतिवीर..अखेर रोहिले बुद्रुक चमकले..

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी चौदावे रत्न दाखवल्याने घडला चमत्कार

नांदगाव---संतोष कांदे

महानगरी एक्स्प्रेस ला थांबा मिळवून देणेकामी नांदगाव मध्ये आलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेतली.तीत वीज वितरण कंपनीचा प्रश्न प्रामुख्याने गाजला.गेल्या चार महिन्यापासून अंधारात असलेल्या घाटमाथ्यावरील रोहिले बुद्रुक च्या प्रश्नावर खासदार चव्हाण अक्षरशः वीज वितरण कंपनीवर संतापले...म्हणून हा वीज प्रश्न तत्काळ मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
       खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची आढावा बैठक सुरू असतानाच ; रोहिले बुद्रुक चे सरपंच अनिल अरबुज यांनी पुढे होत,गावाचा वीज प्रश्न कंपनीच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षामुळे कसा भिजत घोंगडे पडला आहे,व त्यामुळे गावाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत याचा पाढाच वाचला.सुमारे चार महिन्यापासून वीज नसताना नियमित वीज बिल भरून घेणाऱ्या वीज वितरण कंपनी विषयी सर्वांच्याच मनात संताप जागा झाला,तेव्हा कुणी भ्रष्टाचाराने बरबटलेले म्हटले तर कुणी बैल ही म्हटले,तेव्हा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी संयम राखत ही समस्या केव्हा मार्गी लावणार ? या एकच प्रश्नावर सूर लावत वीज वितरण कंपनीस शब्द देण्यात भाग पाडले.
     आठ दिवसापासून कळमदरीचा ही वीज प्रश्न गहन बनला होता,तो ही प्रश्न आढावा बैठकीत हनुमंत सानप यांनी उपस्थित केला होता.या दोन्ही प्रश्नांची तत्काळ उकल झाल्याने ग्रामस्थांनी खा.चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ