सा.क्रांतिवीर...जळगाव बुद्रुक च्या शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही झाली हक्काची बाजारपेठ

नांदगाव-----संतोष कांदे

शेतमालाला मुक्त बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत ; तर ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला मिळू लागल्याने नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
      तालुक्यातील अनेक गावांत भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा बाजार त्या-त्या वाराला भरू लागला आहे.या वस्तूंचा व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांसह,स्थानिक शेतकऱ्यांनाही या बाजाराचा फायदा होत आहे व भविष्यात ही होणार आहे.तालुक्याच्या गावी असणारे दर व गावात मिळणाऱ्या स्वस्त दरामुळे ग्राहकांनाही फिलगुड चा अनुभव येत आहे.आणि त्यांचाही आर्थिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
     दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गावात जोरदार पाऊस कोसळल्याने शेतीपिकांना आधार झालाच,पण या भाजीपाला विक्रेत्यांचे मात्र मोठे नुकसान झाले.
      

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ