सा.क्रांतिवीर..बातमी नांदगाव येथील महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना +2स्तरद्वारे शिक्षकदिन संपन्न

नांदगाव---संतोष कांदे,

     जो शिष्याला मार्ग  दाखवतो  अन त्यावर उपचार करतो तोच खरा गुरू होय विद्यार्थ्याचे गुण ओळखून त्याच्या जीवनाला व संस्कारक्षमतेला आकार देण्याचे काम शिक्षक तनमन धनाने करत असतो प्रसंगी तो सुख-दुख विसरून अध्यापन करत असतो तो समाज घडविण्याचे कार्य करतो म्हणून तो समाजघटकातील एक आदर्श घटक आहे गुरू शिवाय विद्यार्थी घडु शकत नाही असे विचार प्रा.सुरेश नारायणे यांनी व्यक्त केले.
        ते येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेनेआयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल होते शिक्षक व विद्यार्थी  यांचे नाते घनिष्ठ असते त्याचा सर्वांगीन विकास करण्याचा प्रयत्न करतो असे मनोगतातुन प्रा.व्ही.पी गढरी यांनी विचार मांडले छ.शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ व रामदास स्वामी या गुरूकडुन संस्कार व संस्कृती रक्षणाचे धडे मिळाले म्हणून छ.शिवाजी महाराजांसारखे आदर्श राजे घडले असे प्रा.जावेद शेख यांनी शिक्षकांविषयी मनोगतात म्हणाले तर भुषण तळेकर,मेघा निकम,मयुरी उशिरे,शुभम पाटिल,हिम्मत सानप यांनी शिक्षकांबद्दल आदरभाव व्यक्त केला यावेळी कनिष्ठ  महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी.देवरे, राष्ट्रीय सेवा योजना +2स्तर कार्यक्रम अधिकारी  प्रा.आर.एल.दिवटे,प्रा.सी.डी.काटे,प्रा.वाय.एस.जाधव,प्रा.श्रीमती  जैनाब अन्सारी व स्वयंसेवक उपस्थित होते  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  भाग्यश्री मुजुमदार हिने केले तर सिमा राठोड या स्वयंसेवीकेने आभार मानले.

 

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ