सा.क्रांतिवीर...तहसीलदार आवळकंठे यांनी केली नस्तनपूर ची पाहणी
नांदगाव----संतोष कांदे
तालुक्याचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी नस्तनपूर येथील श्री.शनी संस्थानला भेट देत पाहणी केली,व संस्थान च्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शनिवार (दि.१८) रोजी पहिला श्रावण शनिवार निमित्त साडेतीन शनी पीठांपैकी एक संपूर्ण असे आद्यपीठ व प्रभू रामचंद्र स्थापित श्री शनी महाराज मंदिर संस्थान येथे दुपारी १२.०० वा.नैवेद्य व महाआरती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे,देविदास चव्हाण (रा,चांदोरा ता.नांदगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
आरती नंतर संस्थान तर्फे भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले तसेच संस्थानने भाविकांच्या सोईसाठी स्वतंत्र अभिषेक व सत्यनारायण कक्ष उभारले होते आणि नवसपूर्तीचे कार्यक्रम(दाळ बट्टी) करण्यासाठी अतिरिक्त प्रसादालय शेड उभारण्यात आले होते.
यावेळी जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर,अध्यक्ष नारायण अग्रवाल,माजी उपसभापती उदय पवार,विश्वस्त विजय चोपडा,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील,डॉ.प्रवीण निकम,खासेराव सुर्वे,उदय पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment