सा.क्रांतिवीर...सौ.क.मा. कासलीवाल विद्यालयात रक्षाबंधन

नांदगाव----/संतोष कांदे

बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन....स्त्री कुठलीही असो तिला सुरक्षितता मिळवून देणारे नाते अधोरेखित करणारा सण म्हणजे रक्षाबंधन...आणि याची बाल वयापासून जाणीव व्हावी,या उदात्त हेतूने शहरातील सौ. क.मा.कासलीवाल विद्यालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
           भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण भावा बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सौ.क.मा.कासलीवाल विद्यालयात रक्षाबंधन हा सण बाल गोपाळांनी शालेय मैदानावर उत्साहात साजरा केला.व यावेळी या भावानीं ही आपल्या बहिणींना छोटीशी भेटवस्तू म्हणून चॉकलेट दिले.या सणाचे महत्व सांगणारी श्रीकृष्ण व द्रौपदी या भावा बहिणीची गोष्ट मुख्याध्यापक श्री व्ही पी सावंत यांनी सांगितली.
     संस्थेचे अध्यक्ष सुनिलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सरचिटणिस प्रमिला कासलीवाल, संचालक महेंद्र चांदीवाल यांनी  कौतूक केले. यासाठी  श्री. जगताप सर, फणसे सर, पाटील सर,थोरात श्रीमती. देवरे, पठाण, चोळके, पवार, निकम, देशमुख, शिंदे, सुरळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ