सा.क्रांतिवीर..ज.ता.का.व सौ.क.मा.कासलीवाल विद्यालयात ध्वजारोहन उत्साहात
नांदगाव---संतोष कांदे
शहरातील जगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल व सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहन नगरपालिका अध्यक्ष राजेश कवडे यांचे हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी विद्यालयाच्या स्काऊट गाईड,व लेझीम पथकाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मूक अभिनयाद्वारे विविधतेतून एकता या विशेष कार्यक्रमासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन विषयक आपले विचार ही मांडले.शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या भक्ती दिलीप करवा हिचा संस्थेचे अध्यक्ष सुनील कासलीवाल यांनी सत्कार केला.
यावेळी अध्यक्ष सुनील कासलीवाल,नगराध्यक्ष राजेश कवडे,श्रीमती कमलबाई कासलीवाल,सौ.प्रमिला कासलीवाल,संस्थेचे पदाधिकारी रमण कासलीवाल,विजय चोपडा,महेंद्र चांदीवाल,जुगलकिशोर अग्रवाल,विजय अग्रवाल,रिकबचंद कासलीवाल,प्रशासक गुप्ता,अंकुर कासलीवाल,मयुरी कासलीवाल,यांच्यासह समस्त जैन समाज बांधव,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रातील मान्यवर,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment