सा.क्रांतिवीर..उद्या नांदगाव मध्ये सर्वपक्षीय शोकसभा.
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त...
नांदगाव--संतोष कांदे
नांदगांव तालुका, शहर भाजपा शाखेतर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धाजंली व्यक्त करणेसाठी सर्वपक्षीय जाहीर शोक सभेचे आयोजन ज्ञानेश्वर माऊली मंदिरात उद्या (दि.२०) रोजी करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी दिली.
तालुका व नांदगांव शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक संस्था,व्यापारी संघटना,कामगार संघटना व मान्यवर नागरिक बंधू भगिनी ना शोकपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment