सा. क्रांतिवीर...येत्या ४ ते ५ दिवसात पाऊस पडला नाही तर नांदगाव तालुक्यात दुष्काळ अटळ.!
तालुका कृषी विभागाचा अहवाल शासनाला सादर...
नांदगाव---संतोष कांदे
तालुक्यातल्या ५ कृषी मंडळात ६३ हजार ९९२ हेक्टर खरीप पेरणीचा लक्षांक ठेवण्यात आला होता,त्यापैकी ५३ हजार ६८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली असली, तरी पावसाने ३५ ते ४८ दिवसांची ओढ दिल्याने पिके मृत अवस्थेकडे वाटचाल करत असल्याचा अहवाल तालुका कृषी विभागाने शासनाला सादर केला आहे.त्यामुळे दुष्काळ केव्हा जाहीर होतो.? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा मृग नक्षत्रासह सर्वच नक्षत्र कोरडे गेल्याने रिमझिम पावसावर पेरणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशेचे काळे ढग च आता पर्यंत जमा झाले आहेत.पेरणी पूर्ण झालेल्या पिकांमध्ये मका ने सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे.२७ हजार ३० हेक्टर चा लक्षांक असताना २७ हजार १०६ हेक्टर क्षेत्रात मका लागवड करण्यात आली आहे.तर बाजरी साठी २२ हजार ४० हेक्टर क्षेत्राचा लक्षांक असताना फक्त १३ हजार ५५२ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण करण्यात आली आहे.उर्वरित (पेरणी टक्केवारीत) पिकांमध्ये तूर-५०० टक्के,मूग-३०० टक्के,उडीद-१०० टक्के,कुलथी-४५ टक्के,भुईमूग-११५ टक्के,तीळ-१०० टक्के,सोयाबीन-१० टक्के,कपाशी-५४ टक्के, अशी पेरणी,लागवड पूर्णत्वास गेली आहे.
तालुक्यात पाच मंडळ आहेत,त्यात नांदगाव,मनमाड,हिसवळ, वेहेळगाव, जातेगाव असे वर्गीकरण आहे.या मंडळात मध्यम जमिनीतले पिके येत्या ४/५ दिवसात पाऊस नाही पडला तर पूर्णतः नष्ट होतील,तर भारी जमिनीत ८/१० दिवसात.! आणि पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाने जी दडी मारली,त्यात नांदगाव-४५ दिवस,मनमाड-३५ दिवस,हिसवळ-४७ दिवस,जातेगाव-४२ दिवस असे अंतर आहे.
पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटून,घनतेत मोठी तफावत निर्माण होणार असल्याचा शासकीय अहवाल आहे.त्यामुळे या अन्नधान्य पिकांसह नगदी पिकांमध्ये मका-६० टक्के,बाजरी-४० टक्के,कपाशी-५० टक्के,कडधान्ये-४५ टक्के,तर तेलबिया मध्ये-४५ टक्के घट येईल.
वरील पाच मंडळात १ जून ते ३० जुलै पर्यंत नांदगाव-७३ मी.मी.,मनमाड-१६७ मी.मी.,हिसवळ-१४ मी.मी.,वेहेळगाव-६५ मी.मी.,जातेगाव-६० मी.मी.इतका अत्यल्प पाऊस कोसळला आहे.त्यामुळे येत्या चार/पाच दिवसात दुष्काळाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment