सा.क्रांतिवीर...महिलांनी बचत गटांद्वारे प्रगती साधावी.!
नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरीच्या सरपंच सौ.मंगला नावंदर यांचे प्रतिपादन
नांदगाव---संतोष कांदे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत मुळडोंगरी येथे गरीब,शासकीय योजनांपासून वंचित,एकल,व दुर्लक्षित कुटुंबातील महिलांना संघटीत करून त्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी बचत गटांची निर्मिती काळाची गरज आहे.असे प्रतिपादन सरपंच सौ.मंगला प्रकाशचंद्र नावंदर यांनी केले.
बचत गट स्थापना करण्यासंदर्भात गावातील सर्व घटकातील महिलांचा मेळावा घेण्यात आला,त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.पंचायत समितीचे बचत गट समन्वयक श्री.झाल्टे,श्रीमती जाधव यांनी यावेळी बचत गट निर्मिती व त्याचे फायदे,शासकीय सवलती याविषयी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
Comments
Post a Comment